

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ च्या ३१ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स पंजाब किंग्जशी भिडत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीचे निमंत्रण दिले. शिखर धवनच्या अनुपस्थिती आणि अष्टपैलु सॅम करणच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने मुंबई समोर २१५ धावांचे बलाढ्य आव्हान ठेवले आहे. पंजाब किंग्जने निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात २१४ धावा केल्या. (MI vs PKBS)
सॅम करणने कर्णधाराची जबाबदारी पार पाडत २९ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. यासह हरप्रित सिंग भाटीया २८ चेंडूत ४१ तर प्रभासिमरन सिंग १७ चेंडूत २६, अथर्व तायडे १७ चेंडूत २९ आणि जितेश शर्मा याने ७ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरशा: पिसे काढली. जोफ्रा आर्चर, जेसन बेहरनड्रॉफ, कॅमरुन ग्रीन या अनुभवी गोलंदाजांसह अर्जुन तेंडूलकर सारख्या नवख्या गोलंदाजांना धूवून काढले. (MI vs PKBS)
अनुभवी पियुष चावलाने अत्यंत कसून गोलंदाजी करत ३ षटकात १५ धावा देत २ विकेट घेतले. ग्रीनने ४ षटकात ४१ धावा देत २ बळी घेतले. जेसन बेहरनड्रॉफने तीन षटकात ४१ धावा देत १ बळी जोफ्रा आर्चरने ४ षटकात ४२ धावा देत १ बळी आणि अर्जुन तेंडूलकरने ३ षटकात तब्बल ४८ धावा दिल्या व १ बळी घेण्यात यश मिळवले.
अधिक वाचा :