हर्षल पटेलने साधली चेन्नईच्या सर्वात यशस्वी गोलंदाजाबरोबर बरोबरी - पुढारी

हर्षल पटेलने साधली चेन्नईच्या सर्वात यशस्वी गोलंदाजाबरोबर बरोबरी

शारजाह : पुढारी ऑनलाईन

रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात हर्षल पटेलने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. हर्षलने केकेआरचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये धडाले. त्याने पहिल्यांदा १८ चेंडूत २९ धावांची खेळी करणाऱ्या शुभमन गिलला बाद कले. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा सेट झालेला फलंदाज व्यंकटेश अय्यरला बाद करत केकेआरला दुसरा मोठा धक्का दिला.

या विकेट बरोबरट हर्षल पटेलने यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या ३२ विकेट पूर्ण केल्या. यंदाच्या हंगामात हर्षल पटेलने आपल्या भेदक गोलंदाजीने रॉयल चॅलेंजर बेंगलोरला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. त्याने पॉवर प्लेनंतर आरसीबीला कायम विकेट काढून दिल्या आहेत. टी २० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेनंतर जो संघ सामन्यावर नियंत्रण ठेवतो तो संघ सहसा सामना जिंकतो असे दिसते. हर्षल पटेलच्या या विकेट टेकिंग गोलंदाजीमुळेच आरसीबी यंदा प्ले ऑफमध्ये दाखल होऊ शकली आहे.

आजच्या सामन्यात ११ वे षटक टाकायला आलेल्या हर्षल पटेलने आपल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर २६ धावा करुन खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरला बाद केले. हा त्याचा यंदाच्या हंगामतला ३२ वा बळी ठरला. याच बरोबर त्याने चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात यशस्वी गोलंदाज ड्वेन ब्रोव्होच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. ब्राव्होने २०१३ च्या आयपीएल हंगामात ३२ विकेट घेतल्या होत्या.

हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दोनच भारतीय ( हर्षल पटेल )

आता या यादीत हर्षल पटेल ३२ विकेट घेत ब्राव्हो संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नतंर या यादीत कसिगो रबाडा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २०२० च्या आयपीएल हंगामात ३० विकेट घेतल्या होत्या. त्या पाठोपाठ तिसऱ्या स्थानावर जेम्स फॉकनर आहेत. त्याने २०१३ च्या हंगामात २८ विकेट घेतल्या होत्या. २८ ( २०११ ) विकटे घेत लसिथ मलिंगाचौथ्या स्थानावर तर २७ ( २०२० ) विकेट घेत जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.

या यादीत हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह हे दोघेच भारतीय गोलंदाज आहे. हर्षल पटेलला आजच्या सामन्यात ब्रोव्होचे हे रेकॉर्ड तोडण्याची संधी होती. मात्र त्याला आपल्या अखेरच्या षटकात विकेट घेण्यात अपयश आले.

Back to top button