GT vs DC : साई सुदर्शनच्या खेळीने गुजरातने केली दिल्ली सर | पुढारी

GT vs DC : साई सुदर्शनच्या खेळीने गुजरातने केली दिल्ली सर

पुढारी ऑनलाईन डेस्क : डेव्हिड मिलरची आक्रमक खेळी साई सुदर्शनची दमदार अर्धशतकी खेळी आणि राशिद खानच्या महत्वपूर्ण ३ विकेट्सच्या बळावर गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ६ गडी राखून दिमाखदार विजय मिळवला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आयपीएल २०२३ मधील ७ वा सामना खेळवण्यात आला होता. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने १६२ धावा केल्या आणि गुजरातसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले. दिल्लीचे आव्हान गुजरातने १९ व्या षटकात गाठले. दिल्लीकडून आनरिख नोर्खियाने २ विकेट्स तर खलील अहमद आणि मिचेल मार्शने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीने .१६२ धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या ३२ चेंडूमध्ये ३७ धावा, अक्षर पटेलच्या २२ चेंडूमध्ये ३६ धावा आणि सर्फराज खानच्या ३४ चेंडूमध्ये ३० धावा केल्या याच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या आणि गुजरात टायटन्ससमोर १६३ धावांचे आव्हान ठेवले आहे.

गुजरातला धावापर्यंत रोखण्यात दिल्ली कॅपिटल्सला यश आले आहे. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने ३ विकेट्स पटकावल्या. तर मोहम्मद शमी आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. गुजरातच्या गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीच्या एकाही खेळाडूला ४० धावांचा टप्पा पार करता आला नाही.

हेही वाचंलत का?

Back to top button