MI vs RCB : मुंबई इंडियन्सचे बेंगलोर समोर १७२ धावांचे आव्हान | पुढारी

MI vs RCB : मुंबई इंडियन्सचे बेंगलोर समोर १७२ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आज आयपीएलमध्ये दुसऱ्या लढतीत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा सामना रंगणार आहे. हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. बेंगलोरचा कर्णधार फॅफ डू प्लेसीसने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने मुंबईला मोठी धावसंख्या उभारु दिलेली नाही. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या असून बेंगलोर समोर १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. बेंगलोरच्या गोलंदाजांनी कंजूसपणे गोलंदाजी करत मुंबईची धावसंख्या रोखली.

तिलक वर्माच्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला ही धावसंख्या उभारता आली आहे. त्याने ४६ चेंडूमध्ये ८४ धावा केल्या. तिलक वर्माशिवाय मुंबईकडून कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून निहाल वढेरा १३ चेंडूमध्ये २१ धावा, सुर्यकुमार यादव १६ चेंडूमध्ये १५ धावा, इशान किशन १३ चेंडूमध्ये १० धावा केल्या. करन शर्माने २, मोहम्मद सिराज, रेस टोपले, आकाश दीप, हर्षल पटेल, मिचेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावल्या.

 हेही वाचंलत का?

Back to top button