

पुढारी ऑनलाइन डेस्क : Fifa World Cup : फिफा विश्वचषकासाठी विवादास्पद उपदेशक झाकीर नाइकला निमंत्रण नाही, अशी माहिती विदेश मंत्रालयाने गुरुवारी दिली. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, कतारकडून याबाबत माहिती मिळाली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, झाकीर नाईक हा भारतात विवादास्पद उपदेशक आणि भडकाऊ भाषणांबद्दल आरोपी आहे. त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे झाकिर नाईकला फिफा विश्वकपात निमंत्रण देण्यात आले आहे का हा प्रश्न कतार मध्ये मांडण्यात आला होता. यावेळी कतारकडून माहिती देण्यात आली की झाकिर नाइकला अशा प्रकारचे कोणतेही निमंत्रण नाही, बागची यांनी म्हटले आहे.
Fifa World Cup : मनी लॉन्ड्रिंग, प्रक्षोभक भाषणे, दहशतवाद्यांशी लागेबांधे असलेला आणि केंद्र सरकारने फरार घोषित केला आहे. तसेच यापूर्वी तो मलेशियाला पळून गेला होता. तेव्हापासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत प्रयत्नशील आहे, अशा परिस्थितीत झाकीर नाईक कतारमध्ये असून कतारच्या सरकारी दूरचित्रवाणीच्या सादरकर्त्याने ट्वीट करत याचा खुलासा केला आहे. कतारमध्ये एकीकडे फुटबॉल विश्वचषक सुरु असताना याच काळात झाकीर नाईक (Zakir Naik) धर्मावर व्याख्याने देणार आहे, असे वृत्त होते. त्यामुळे विदेश मंत्रालयाकडून कतारकडे झाकीर नाईकबाबत विचारणा करण्यात आली होती.
अलकास या कतारमधील सरकारी क्रीडा दूरचित्रवाहिनी कार्यक्रम सादरकर्ते अल्हाजरीने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, शेख झाकीर नाईक हे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या काळात कतारमध्ये आहेत. या स्पर्धेच्या काळात ते धार्मिक व्याख्याने देणार आहेत.
Fifa World Cup : ९० च्या दशकात आपल्या धार्मिक व्याख्यानामुळे झाकीर नाईक चर्चेला आला होता. त्याची काही धार्मिक व्याख्याने सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यातील काही व्याख्यानेही अत्यंत वादग्रस्त होती. अन्य धर्मांविषयी आपल्या अनुयायींना भडकविण्याचा झाकीर नाईकवर आरोप होता. २०१६ मध्ये केंद्र सरकारने त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर बॅन आणाला होता. २०१७ पासून झाकीर नाईक फरार असून त्याने मलेशियात आसरा घेतला आहे.
राष्ट्रीय सुरक्षेचा हवाल देत मलेशिया सरकारने २०२० पासून त्याच्या भाषणावर बंदी घेतली आहे. जुलै २०१६ पासून झाकीर हा फरार आहे. यानंतर एक वर्षाने केंद्र सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला. त्यावेळी त्याने आपण 'एनआरआय' होतो असा दावा केला होता.
Fifa World Cup : ढाका बॉम्बस्फोटानंतर झाकीर आला होता चर्चेत
२०१६ मध्ये बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये २२ नागरिक ठार झाले होते. या प्रकरणी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. झाकीर नाईक याच्या भाषणांचा आमच्या प्रभाव होता, यातूनच आम्ही हल्ला केला, असा कबुलीजबाब दहशतवाद्यांनी दिला होता.
मुंबईतील पोलिसांच्या विशेष पथकाने आणि त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने ( एनआयए ) या प्रकरणाचा तपास केला होता. प्राथमिक तापसानंतर झाकिरच्या मुंबईतील डोंगरी येथे असणार्या 'आयआरएफ' या एनजीओवर बंदी घालण्यात आली होती. २०१७ पासून झाकीर नाईक फरार असून त्याने मलेशियात आसरा घेतला आहे.
हे ही वाचा :