

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषकातील आजच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला. रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला. विराट कोहलीने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ३४ चेंडूमध्ये ३५ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने २ चौकार आणि २ षटकार लगावत २८ चेंडूमध्ये ३५ धावांची खेळी केली. विराट कोहलीच्या या दमदार खेळीच्या बळावर भारताने हा विजय संपादन केला.
आशिया चषकामध्ये आज भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने होते. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीच्या निर्णय घेतला होता. यानंतर पाकिस्तानने भारतासमोर १४८ धावांचे आव्हाने दिले होते. सुरुवातीला हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारच्या अचुक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या डाव ढेपाळला होता. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी ४ विकेट्स पटकावल्या. आशिया कप मधील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात आज 'अ' गटातील दोन संघ आज आमने-सामने होते. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यानंतर पाकिस्तानने भारतीय संघासमोर १४८ धावांचे आव्हान दिले आहे.
तत्पुर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक टी-20 सामन्यात भारताच्या कडक गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजीने नांगी टाकली. त्यांचा संपूर्ण डाव 19.5 षटकांत 147 धावांत संपला. भुवनेश्वर कुमारने 26 धावांत 4 तर हार्दिक पंड्याने 25 धावांत 3 विकेटस् घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना सुरुंग लावला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारत तीन वेगवान गोलंदाज घेऊन उतरला. भारतीय संघात आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे तीन वेगवान गोलंदाज खेळले. याचबरोबर ऋषभ पंतच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली.
पहिल्याच षटकातच सामन्याचा रोमांच पाहायला मिळाला. भुवनेश्वरचे षटक चांगलेच धडधड वाढवणारे ठरले. त्याच्या दुसर्याच चेेंडूवर मोहम्मद रिझवानला पायचित देण्यात आले होते, मात्र पाकिस्तानचा रिव्ह्यू यशस्वी ठरला आणि रिझवान बचावला. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताने यष्टिमागे झेलासाठी रिव्ह्यू घेतला मात्र तो अयशस्वी ठरला. ही सलामीची जोडी सेट होणार असे वाटत असताना भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या तिसर्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार बॅटस्मन बाबर आझमला 10 धावांवर बाद करत पहिला आणि मोठा धक्का दिला. भुवनेश्वरचा उसळणारा चेंडू बाबरला नीट खेळता आला नाही, त्याने शॉर्ट फाईनलेगवरील अर्शदीपकडे सोपा झेल दिला.
पॉवरप्लेचे शेवटचे षटक घेऊन आलेल्या आवेश खानला रिझवानने षटकार आणि चौकार ठोकून स्वागत केले; परंतु पाचव्या चेंडूवर उसळता चेेंडू खेळताना बॅटची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे गेला. विशेष म्हणजे त्याच्यासह जवळच्या भारतीय खेळाडूंनी अपिल केली नाही, पण फखर झमान मात्र प्रामाणिकपणे क्रीज सोडून गेला. भारताला दुसरे यश 42 धावांवर मिळाले.
यानंतर रिझवानला साथ देण्यासाठी इफ्तिकार अहमद आला. भारताच्या यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांनी पाकिस्तानी फलंदाजांना चांगलेच जखडले होते. त्यातून इफ्तिकारने चहलला षटकार ठोकला; परंतु पुढच्या चेंडूवर त्याचा झेल चहलने सोडला, पण पुढच्या षटकांत हार्दिकचा उसळता चेंडू खेळताना इफ्तिकारने दिनेश कार्तिककडे झेल दिला.
त्याने 28 धावा केल्या. सामन्यात दोन्ही संघ बरोबरीने चालले होते; परंतु खेळपट्टीवर रिझवान ठाण मांडून होता, ही रोहितसाठी चिंतेची बाब होती; परंतु हार्दिक पंड्याने रोहितची ही चिंता दूर करताना एका अप्रतिम बाऊन्सरवर रिझवानची मोहीम संपुष्टात आणली. आवेश खानने थर्डमॅनवर त्याचा झेल घेतला. रिझवानने 42 चेंडूंत 43 धावा केल्या. याच षटकांत हार्दिकने खुशदिल शाहला (2) बाद केले.
हार्दिकच्या स्पेलनंतर भुवनेश्वरने आपल्या दुसर्या स्पेलमध्ये असिफ अली (9), शादाब खान (10) आणि नसीम शाह (0) यांना बाद करून पाकिस्तानच्या मोठ्या धावसंखेला लगाम घातला. युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने मोहम्मद नवाझ (1) आणि शहानवाझ दहानी (16) यांची शिकार केली. पाकिस्तानचा डाव 19.5 षटकांत 147 धावांत संपुष्टात आला.