इंग्लंडचा अंतिम संघ जाहीर

अंतिम संघ www.pudharinews.
अंतिम संघ www.pudharinews.

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबस्टन कसोटीसाठी इंग्लंडने सामन्याच्या पूर्वसंध्येला प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉटस् आणि जेम्स अँडरसन अशी वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांच्या संघात जॅक लिच हा एकमेव फिरकीपटू आहे. याचबरोबर कर्णधार बेन स्टोक्सदेखील वेगवान गोलंदाजी करतो. त्यामुळे इंग्लंड चार वेगवान आणि एक फिरकीपटू असे कॉम्बिनेशन घेऊन उतरणार आहे.

याचबरोबर नव्याने नियुक्‍ती झालेला प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमची ही दुसरी मालिका असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडला 3-0 असा 'व्हाईटवॉश' दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेबाबत बोलायचे झाले, तर ज्यावेळी मालिकेतील 5 वा सामना स्थगित करण्यात आला होता, त्यावेळी भारत मालिकेत 2-1 असा आघाडीवर होता. मात्र, पाचवी कसोटी होण्यापूर्वी दोन्ही संघांत अनेक बदल झाले आहेत.

भारत आणि इंग्लंड यांचे कर्णधार आणि प्रशिक्षक बदलले आहेत. भारताचा त्यावेळी कर्णधार विराट कोहली होता, तर प्रशिक्षक रवी शास्त्री होते. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असला, तरी या कसोटीत बुमराह नेतृत्व करणार आहे. तर प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे आहे. दुसर्‍या बाजूला इंग्लंड संघातही नेतृत्व बदल झाला आहे. संघाचा कर्णधार आता बेन स्टोक्स असून, प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम आहे.

असा आहे इंग्लंडचा संघ

झॅक क्राऊली, अ‍ॅलेक्स लीस, ऑली पोप, जो रूट, जोनाथन बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, मॅथ्यू पॉटस्, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news