विराट कोहलीची सुपरफॅन चारुलता पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतीय क्रिकेट टीमची सुपरफॅन चारुलता पटेल यांचे निधन झाले. त्यांनी १३ जानेवारीला अखेरचा श्वास घेतला. चारुलता पटेल विराट कोहलीची फॅन होत्या. आयसीसी वर्ल्ड कप २०१९ च्या सामन्यावेळी ८७ वर्षीय क्रिकेट फॅन चारुलता पटेल चर्चेत आल्या होत्या. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपदरम्यान चारुलता यांनी स्टेडियमवर पोहोचून टीम इंडियाला सपोर्ट केले होते. इतकेच नाही तर कर्णधार विराट कोहली ते उपकर्णधार रोहित शर्माची भेटही घेतली होती. विराट आणि रोहितने त्यांचा आशीर्वाददेखील घेतला होता. 

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि बांग्लादेश मध्ये झालेल्या सामन्यानंतर पटेल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विराट आणि रोहितदेखील पटेल आजीचा उत्साह पाहून आश्चर्य वाटले होते. बांग्लादेशविरूध्द मॅच संपल्यानंतर विराट आणि रोहितने पटेल यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता.

चारुलता पटेल यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे, 'खूपच दु:खाने सांगत आहे की, 'आमच्या आजीने १३ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता शेवटचा श्वास घेतला होता.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news