होबार्ट इंटरनॅशनल : सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानियाने यूक्रेनी साथीदार नादिया किचेनोकसोबत उपांत्यपूर्व फेरीत जोरदार प्रदर्शन करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. शुक्रवारी सानिया- नादिया किचेनोकचा सामना स्लोवेनियाई-चेक जोडी तमारा जिदानसेक-मेरी बुजकोवाशी होणार आहे. 

गुरुवारी सानिया-नादियाच्या जोडीने अमेरिकेच्या वानिया किंग आणि क्रिस्टीना मॅकहेलच्या जोडीने ६-२, ४-६, १०-४ असा पराभव केला. हा सामना १-१ च्या बरोबरीने होता. परंतु, सानिया-नादिया जोडीने टाय-ब्रेकमध्ये बाजी मारली. सानिया-नादिया जोडीने याआधी मंगळवारी जॉर्जियाची ओक्साना कॅलश्निकोवा आणि जपानची मियू काटो या जोडीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता.

एप्रिल २०१८मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाने टेनिसमधून काही काळासाठी विश्रांती घेतली होती. सानियाने दोन वर्षांनंतर कोर्टवर वापसी केली आहे. ती शेवटची स्पर्धा ऑक्टोबर, २०१७ मध्ये चायना ओपन खेळली होती. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news