शेवटच्या क्षणी गोल करत बालगोपालची शिवाजीवर मात  

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित 'केएसए' लीग फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारचा दिवस बालगोपाल तालीम मंडळाचा ठरला. बालगोपाल संघाने शिवाजी तरूण मंडळाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असणार्‍या सातव्या व अंतिम फेरीतील सामना बालगोपाल तालीम विरुद्ध शिवाजी तरूण मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला, आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. पण सामन्याचा पू्र्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला. 

पूर्वार्धात सामन्यावर दोन्हीही संघानी चांगी पकड ठेवली होती. दरम्यान शिवाजी मंडळाकडून आक्रमक खेळी करण्यात येत होता तर बालगोपालकडून बचावात्मक खेळ करण्यात येत होता. शिवाजीकडून फिनिशिंग होत नसल्याने गोल करण्याच्या अनेक संधी हुकल्या, याउलट बालगोपालकडून बचाव फळीची उत्कृष्ट खेळीमुळे शिवाजी मंडळाला गोलपासून रोखण्यात यश आले. दुसऱ्या सत्रात बालगोपालने आक्रमक खेळी करत शिवाजीवर अखेरच्या क्षणी एक गोल दागला. या गोलची परतफेड करण्याचा शिवाजीने प्रयत्न केला पण, बालगोपालच्या भक्कम बचावापुढे शिवाजी तरुण मंडळ हतबल होते. अखेर बालगोपालने शिवाजी तरुण मंडळाचा १ – ० असा पराभव करत सामना जिंकला. 


 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news