रोहित सर्वात वेगवान 7 हजारी मनसबदार सलामीवीर, तर राहुलही हजारी मनसबदारीत 

राजकोट : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने हाशीम अमला आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकत विक्रमाची नोंद केली. तर लोकेश राहुलनेही आपल्या एकदवसीय कारकिर्दितील 1 हजार धावा पूर्ण केल्या. रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 7 हजार धावा करणारा सलामीवीर ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा हाशीम अमला आणि भारताच्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.  

वाचा : विराटने पहिल्या सामन्यातील चूक सुधारली

पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात 42 धावांची खेळी करत शिखरबरोबर 81 धावांची सलामी दिली. याचबरोबर त्याने सलामीवीर म्हणून एकदिवसीय कारकिर्दितील 7 हजार धावाही पूर्ण केल्या. आता तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 7 हजार धावा करणारा सलामीवर झाला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा हाशीम अमलाला आणि भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. रोहित शर्माने 137 एकदिवसीय डावात 7 हजारी मनसबदारी मिळवली तर अमलाला यासाठी 147 डाव लागेले होते. तर सलामीला खेळत असताना सचिन तेंडुलकरने 160 एकदिवसीय डावात 7 हजार धावांचा टप्पा पार केला होता. रोहित आता भारताकडून 7 हजार धावा पूर्ण करणारा चौथा सलामीवीर ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांनी सलामीला येत 7 हजार धावा केल्या होत्या. 

वाचा : #INDvAUS : कांगारुंसमोर भारताचा 340 धावांचा डोंगर

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलने दुसऱ्याही सामन्यात दमदार 80 धावांची खेळी करत भारताला 340 धावांपर्यंत पोहचवले. याचबरोबर 65 वी धाव काढत त्याने एकदिवसीय सामन्यात 1 हजार धावा पूर्ण केल्या. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news