विराटने पहिल्या सामन्यातील चूक सुधारली

राजकोट : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आज (दि.17) राजकोट येथे होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताने नाणेफेक हरल्याने कांगारुंनी भारताला चेस करण्याची संधी न देता प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. पहिल्या सामन्यातही भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली होती. पण, चांगल्या सुरुवातीनंतर भारताची धावगती मंदावली. यासाठी भारताची बॅटिंग ऑर्डर जबाबदार असल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले होते. ही चूक कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात सुधारली. 

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना 10 विकेट्सनी गमावल्यानंतर आज (दि.17) राजकोट येथे होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. मधली फळी मजबूत करण्यासाठी दुखापतग्रस्त ऋषभ पंतऐवजी मनीष पांडेला संधी दिली आहे. तर शार्दुल ठाकूर ऐवजी तेजतर्रार नवदीप सैनला संघात जागा मिळाली आहे. याचबरोबर प्रथम फलंदाजी करताना विराटने गेल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर लोकेश राहुलला पाठवले होते. त्यामुळे मुंबईसारख्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर भारत 30 व्या षटकापर्यंत कसाबसा 150 पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे मधल्या फळीवर धावांची गती वाढवण्याचा अतिरिक्त ताण आला होता. 

पण, दुसऱ्या सामन्यात विराटने ही चूक सुधारून तिसऱ्या क्रमांकावर स्वतः आला. यामुळे भारताची शिखर आणि रोहितने सेट केलेली धावगती कायम राखण्यात भारताला यश आले. जरी रोहित 42 धावा करुन बाद झाला तरी भारत मजबूत स्थितीत आहे. भारताने 22 षटकात एका गड्याच्या मोबदल्यात 130 धावांपर्यंत मजल मारली. विराट बॉल टू रन करत आहे त्यामुळे भाराताला धावगती चांगली राखण्यात यश आले आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news