#SpiritOfCricket; न्यूझीलंडच्या खेळाडुंचे कौतुक करावे तेवढे थोडेच

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

न्यूझीलंड संघाच्या कामगिरीबरोबरच क्रिकेट जगतात संघाच्या खेळाडुंच्या स्वभावाचे आणि मैदानावर दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे देखील कौतुक केले जाते. याचा प्रत्यय १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत पाहायला मिळाला. 

बुधवारी न्यूझीलंड आणि वेस्टइंडीज यांच्यात १९ वर्षांखालील खेळवण्यात येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान विंडीजचा फलंदाज कर्क मॅकेन्झी जायबंदी झाला. तो ९९ धावांवर फलंदाजी करीत होता. ४३ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर धाव काढताना मॅकेन्झीनच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला खेळपट्टी सोडावी लागली. 

मॅकेन्झीला मैदानाबाहेर पडताना पायाला गंभीर वेदना होत होत्या. तो लंगडत जात होत्या. याची जाणीव किवींच्या खेळाडुंना झाली. मॅकेन्झीच्या मदतीला धावले. न्यूझीलंडच्या दोन खेळाडुंनी त्याला आपल्या हातांनी उचलून मैदानाबाहेर नेले. किंवींनी मैदानात दाखवलेली माणुसकी पाहुन त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Class acts as always @BLACKCAPS ? #U19CWC | #WIvNZ | #FutureStars pic.twitter.com/3Mt4Nkgrsh


— Cricket World Cup (@cricketworldcup) January 29, 2020

क्रिकेट वर्ल्ड कप यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत किवींच्या खेळाडुंचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी न्यूझीलंडच्या खेळाडुंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news