वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

भारताविरुद्धच्या काल झालेल्या तिसऱ्या  टी -२० सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकासारखीच विजयाने हुलकावणी दिली. भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ट्वेंटी-20 मालिकेनंतर उभय संघांमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर झाला आहे. 

५ फेब्रुवारीपासून भारत विरुद्ध सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी यजमान न्यूझीलंडने१४ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवाय एका युवा खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडनं जाहीर केलेल्या संघात कायले जेमीसन पदार्पण करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्कॉट कुग्गेलइजन आणि हॅमिश बेन्नेट यांचा समावेश करण्यात आला आहे.

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, लोकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडला भारताविरुद्ध एका नवीन वेगवान गोलंदाजांची निवड करावी लागली आहे. भारताविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये न्यूझीलंड संघाला मुख्य वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे

येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या आमच्या वनडे मालिकेच्या अगोदर ब्लॅक कॅप्समध्ये कायले जेमीसन पदार्पण करीत आहे. अशी माहिती ब्लॅक कॅप्स या नावाच्या न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. 

न्यूझीलंड वनडे संघ

केन विल्यमसन (कॅप्टन), हमीश बेनेट, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रॅन्डहोम, मार्टिन गप्टिल, कायले जेमीसन, स्कॉट कुग्गेलैन, टॉम लाथम, जिमी नीशम, हेन्री निकोलस, मिशेल सॅटनर, ईश सोढी (पहिली वनडे), टीम साउथी, रॉस टेलर.

वन डे मालिकेचे वेळापत्रक

५ फेब्रुवारी, सकाळी ७.३० वा.

८ फेब्रुवारी, सकाळी ७.३०वा.

११ फेब्रुवारी, सकाळी ७.३०वा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news