#SuperOver न्यूझीलंड कितीवेळा सुपर ओव्हरमध्ये हरला माहित आहे का? 

हॅमिल्टन : पुढारी ऑनलाईन 

गेल्या वर्षी सुपर ओव्हरमुळेच न्यूझीलंडचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. आज (ता.२९) भारताविरुद्धच्या तिसऱ्या  टी -२० सामन्यातही न्यूझीलंडला सुपर ओव्हरमधील विजयाने हुलकावणी दिली. टाय मॅचमध्ये न्यूझीलंडचा रेकॉर्ड खूप खराब आहे. न्यूझीलंड संघाने सात सामने खेळले आहेत आणि सहा गमावले आहेत. यामधील चार सामने मायदेशात गमावले आहेत. दोन श्रीलंकेत गमावले, तर गेल्यावर्षी त्यांना वर्ल्ड कप सुद्धा सुपर ओव्हर मध्येच गमवावा लागला. 

अधिक वाचा : हिटमॅन रोहितचा आणखी एक विक्रम

भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच गडी गमावून भारताने १७९ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनच्या झुंजार ९५ धावांच्या खेळीने विजय समीप आला होता. मात्र, मोहम्मद शमीने अखेरच्या षटकांत टिच्चून गोलंदाजीने सामना टाय झाला. 

शेवटच्या षटकात न्यूझीलंडला नऊ धावा आवश्यक होत्या. रॉस टेलरने मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून  न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. परंतु उर्वरित चेंडूंवर किवी फलंदाज धावू शकले नाहीत आणि सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार मारत यजमानांना झटका दिला. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने १७ धावा फटकावत भारताला १८ धावांचे आव्हान दिले. रोहित आणि राहुलने शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. रोहितने ठोकलेले दोन षटकार त्याच्या लौकिकास साजेशे होते. 

अधिक वाचा : शर्माजी का बेटा हैं ही ऐसा!

तोंडातील घास खाली पडल्याने कर्णधार केन विल्यम्सन चांगलाच निराश झालेला दिसून आला. तो म्हणाला, की "सुपर ओव्हर्स आमच्यासाठी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे आम्हाला वेळेत चांगली कामगिरी करून चांगले निकाल लावावे लागतील." मागील दोन सामन्यांपेक्षा संघाने या सामन्यात अधिक चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केले. आम्ही सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. आम्ही चेंडूसह उत्तम पुनरागमन केले. दोन्ही संघांनी छोट्या सीमांचा फायदा उठविला. अशा प्रयत्नांनंतर हरणे खूप निराशाजनक आहे, परंतु हा अल्प अंतराचा खेळ आहे. 

कीवी संघाचा कर्णधार पुढे म्हणाला की, अनुभवाचा उपयोग करून भारताने हा खेळ जिंकला. आमच्या तीनही चेंडूवर अनुभवाच्या जोरावर भारत आमच्यापेक्षा पुढे होता हे आम्ही तीन चेंडूंवर पाहिले. त्यांच्याकडून आम्ही शिकले पाहिजे.

अधिक वाचा : भारताचा सनसनाटी विजय; सुपर ओव्हरमध्ये सलग दोन षटकार ठोकून रोहितने विजय खेचला!

न्यूझीलंडचा पहिला टी २० सामना २००६ मध्ये टाय झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय टाय सामना होता. वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड समान १२६ धावा करू शकले होते. ऑकलंडमध्ये झालेल्या या सामन्यात किवी संघाला बॉल आऊटमध्ये ०-३ ने विंडीजने धक्का दिला होता. 

अधिक वाचा : माजी कर्णधार धोनीचा विक्रम विद्यमान कर्णधार विराटने मोडला 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news