#Australian Open नदाल, वॉवरिंकाला पराभवाचा धक्का

मेलबर्न : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आज (दि.29) पुरुष एकेरीत दोन धक्कादायक निकाल लागले. अग्रमानांकित राफेल नदालला उपांत्य पूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्याला पाचव्या मानंकित डॉमिनिक थिएमने 6-7(3-7), 6-7(4-7), 6-4, 6-7(6-8) अशी संघर्षपूर्ण मात दिली. दुसऱ्या उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यात अलेक्झांडर झ्वेरेवने अनुभवी स्टेन वॉवरिंकाचा 1-6, 6-3, 6-4, 6-2 असा पराभव केला. 

वाचा : शर्माजी का बेटा हैं ही ऐसा!

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडररने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत हे दोघे झुंजणार असल्याने दोन दिग्गजांपैकी एकाला उपांत्य फेरीतूनच गाशा गंडाळावा लागणार आहे. त्यामुळे अग्रमानांकित राफेल नदालला तुलनेने ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठणे सोपे असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण, उपांत्य पूर्व फेरीतच नदालला पराभवाचा धक्का बसला. आज झालेल्या सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमने पहिल्या सेटपासूनच कडवी झुंज दिली. पहिले दोन सेट टाय ब्रेकरवर गेले. या दोन्ही अटीतटीच्या सेटमध्ये थिएमची सरशी झाली. त्यानंतर तिसरा सेट नदालने 6-4 असा जिंकत सामना सोडला नसल्याचे संकेत दिले. पण, थिएमने पुन्हा चौथा सेट टाय ब्रेकर पर्यंत नेला आणि टाय ब्रेकर मध्येही कडवी झुंज देत हा सेट 6-7(6-8) असा जिंकून सामना आपल्या नावावर केला. 

वाचा : भारताचा सनसनाटी विजय; सुपर ओव्हरमध्ये सलग दोन षटकार ठोकून रोहितने विजय खेचला!

दुसऱ्या उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यात अनुभवी वॉवरिंकाला आपली विजयी घोडदौड कायम राखता आली नाही. त्याला सातव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेवने 1-6, 6-3, 6-4, 6-2 अशी मात दिली. वॉवरिंकाने पहिला सेट 1-6 असा सहज जिंकल्याने हा सामना तो लिलया खिशात घालेल असे वाटत होते. पण, अलेक्झांडर झ्वेरेवने पुढचे तीनही सेट जिंकत हे खोटे ठरवले. आता शुक्रवारी अलेक्झांडर झ्वेरेव आणि डॉमिनिक थिएम यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या दोघांमधील विजेता गुरुवारी होणाऱ्या फेडरर – जोकोव्हिच यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्याबरोबर अंतिम सामना खेळेल. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news