बीसीसीआयकडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस | पुढारी

बीसीसीआयकडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. याशिवाय अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची शिफारस बीसीसीआयने केली आहे. दरवर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची शिफारस करत असते .

सफेद चेंडूच्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्याने एका विश्वचषकामध्ये पाच शतक झळकावले. असे करणारा तो एकमात्र खेळाडू आहे. यासोबत टी 20मध्ये चार शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येताच त्याने शतके झळकावली.

शिखर धवनने पदार्पणातच सर्वात जलद शतक झळकावण्याचा मान मिळवला. यासोबतच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन वेळा गोल्डन बॅट (सर्वाधिक धावाकरता) मिळवणारा तो एकमात्र फलंदाज ठरला आहे. ईशांत शर्माने भारताच्या गोलंदाजी फळीचे नेतृत्व केले आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा तो युवा भारतीय ठरला आहे. महिला क्रिकेटमध्ये दीप्ती शर्माने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम नोंदवला आहे आणि महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा विकेट्स घेणारी तती एकमात्र भारतीय स्पिनर आहे.

काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी शर्यतीत होते. मात्र अखेरीस वरीष्ठ खेळाडूंसोबतच्या शर्यतीत त्याचे नाव मागे पडले. २०१८ सालीही शिखरचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्यात आले होते. मात्र अंतिम यादीत त्याची निवड झालेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षात कोणत्या खेळाडूची मानाच्या पुरस्कारासाठी निवड होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Back to top button