कोलकाता : पुढारी ऑनलाईन
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वैवाहिक संबंध टोकाला गेले आहेत. हसीन सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. अशा स्थितीत तिने एका शेअर केलेल्या न्यूड फोटोमुळे सर्वांनाच चकित केले आहे. हसीनने मोहम्मद शमीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अधिक वाचा : हार्दिकने दिली 'लॉकडाऊन'मध्ये गुड न्यूज, नताशा गर्भवती!
यामध्ये ते दोघे एकत्र पोज करताना दिसत आहेत. हसीन जहाँ आपल्या पोस्ट केलेल्या फोटो कॅप्शनमध्ये म्हणते की, 'काल तू कोणीच नव्हतास, ते मी पाक होते, आज तू कोणीतरी आहेस तर मी वाईट झाली आहे. खोटेपणाचा बुरखा चढवून सत्य लपवता येत नाही आणि मगरीचे अश्रू काही दिवसच आधार देतात.
हसीनने आपल्या कॅप्शनमध्ये शमीचा उल्लेख केला आहे. हसीनचे पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर बरेच वादंग निर्माण झाले. शमीचे चाहते तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. हसीन जहाँने २०१८ मध्ये पती शमीचे दुसर्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे जाहीर केले होते आणि शमीवर फिक्सिंगचा आरोप केला होता. तथापि, शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले.
अधिक वाचा : श्रीमंत खेळाडूंच्या 'फोर्ब्स'च्या यादीत विराट एकमेव भारतीय
अलीकडेच रोहित शर्माबरोबर इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅट दरम्यान शमीने आरोप झाल्यानंतर मानसिक स्थिती आणखी बिकट झाल्याचे सांगितले. त्या काळात त्याने ३ वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला, परंतु मुलगी आणि कुटुंबामुळे विचार बदलल्याचे तो म्हणाला. शमीने सांगितले की, त्या कठीण परिस्थितीत घरातील सदस्यांनी पूर्ण समर्थन दिले.
अधिक वाचा : 'त्यामुळे' टी-२० वर्ल्डकपवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली मोठी भिती!
या सर्व आरोपानंतर शमी आपली गोलंदाजी आणि फिटनेस सुधारून आता भारताचा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज झाला आहे. सध्या शमी आपल्या गावी आहे आणि तो आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. शमी सुद्धा सोशल मीडियावर बरेच फोटो आणि व्हिडिओही शेअर करत आहे.