पाकिस्तानचा मिसरुडही न फुटलेला गोलंदाज म्हणतो कोहलीबद्दल आदर आहे पण… | पुढारी

पाकिस्तानचा मिसरुडही न फुटलेला गोलंदाज म्हणतो कोहलीबद्दल आदर आहे पण...

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन 

भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या काळातला सर्वोत्तम फलंदाजापैकी एक म्हणून गणला जातो. त्यामुळे अनेक गोलंदाजांचे त्याला गोलंदाजी करताना धाबे दणाणतात. पण, पाकिस्तानच्या 17 वर्षाचा जलदगती गोलंदाज नसीम शाह मात्र विराटबरोबर दोन हात करायला आतुर झाला आहे. पाक पॅशन या वेबसाईटशी बोलताना त्याने भारतीय कर्णधाराचा आदर करतो पण त्याला घाबरत नाही असे वक्तव्य केले. 

मोहम्मद शमीच्या बायकोने शेअर केला ‘न्यूड’ फोटो!

नसीम शाह विराट बद्दल म्हणाला, ‘मला आशा आहे की ज्यावेळी भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल त्यावेळी मी विराटला चांगली गोलंदाजी करेन आणि चाहत्यांची निराशा करणार नाही. विराट बद्दल बोलायचे झाले तर त्याच्याबद्दल आदर आहे पण, त्याला घाबरत नाही.’ पाकिस्तानचा हा युवा तेजतर्रार गोलंदाज पुढे म्हणतो, ‘एखाद्या सर्वोत्तम फलंदाजाला गोलंदाजी करणे कायम आव्हानात्मक असते, पण याच वेळी तुम्हाला तुमच्या खेळाचा स्तर उंचावण्याची संधी असते. मी विराट कोहली आणि भारताविरुद्ध खेळण्यासाठी आतुर झालो आहे.’ 

हार्दिकने दिली ‘लॉकडाऊन’मध्ये गुड न्यूज

नसीम हा एका डावात 5 विकेट आणि पाठोपाठच्या सामन्यात हॅट्ट्रिक करणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. त्यांने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात श्रीलंका आणि जानेवारीत बांगलादेश सामन्याविरुद्ध ही कामगिरी केली होती. हे दोन्ही कसोटी सामने मायदेशात ( कराची, रावळपिंडी ) झाले होते. नसीम हा पाकचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना पहिल्यांदा चर्चेत आला होता. 

Back to top button