आरोप करत बायकोने शेअर केला न्यूड फोटो; मोहम्मद शमीकडूनही जोरदार प्रत्युत्तर! | पुढारी

आरोप करत बायकोने शेअर केला न्यूड फोटो; मोहम्मद शमीकडूनही जोरदार प्रत्युत्तर!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वैवाहिक संबंध टोकाला गेले आहेत. हसीन सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. तिने एका शेअर केलेल्या न्यूड फोटोमुळे सर्वांनाच चकित केले. हसीनने मोहम्मद शमीसोबतचा न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला.  

अधिक वाचा : पाकिस्तानचा मिसरुडही न फुटलेला गोलंदाज म्हणतो कोहलीबद्दल आदर आहे पण…

न्यूड फोटोच्या कॅप्शनमधून हसीनने शमीवर आरोप केले होते. आता शमीने हसीनने केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. स्टार वेगवान गोलंदाज शमी म्हणाला की, हसीनचे सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. तसेच त्याने आरोप सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान दिले. शमीने सांगितले की हसीनबरोबर त्याचा काही संबंध नाही. कोर्टात शमी आणि हसीन यांच्यात लढाई सुरू आहे.

अधिक वाचा : मोहम्मद शमीच्या बायकोने शेअर केला ‘न्यूड’ फोटो!

हसीनने शेअर केलेल्या न्यूड फोटोमध्ये दोघे एकत्र पोज करताना दिसत आहेत. हसीन जहाँ आपल्या पोस्ट केलेल्या फोटो कॅप्शनमध्ये म्हणते की, ‘काल तू कोणीच नव्हतास, ते मी पाक होते, आज तू कोणीतरी आहेस तर मी वाईट झाली आहे. खोटेपणाचा बुरखा चढवून सत्य लपवता येत नाही आणि मगरीचे अश्रू काही दिवसच आधार देतात.

अधिक वाचा : बीसीसीआयकडून खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस

हसीनने आपल्या कॅप्शनमध्ये शमीचा उल्लेख केला आहे. हसीनचे पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर बरेच वादंग निर्माण झाले. सध्या मोहम्मद शमी सध्या गरजूंना मदत करण्यात व्यग्र आहे.  त्याने स्वत: सोमवारी एका कार्यक्रमात प्रवासी कामगार आणि बसेसमधून जाणाऱ्या प्रवाशांना अन्न आणि फळांचे वाटप केले. 

Back to top button