आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या विचारात बीसीसीआय? | पुढारी

आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या विचारात बीसीसीआय?

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2020 चा आयपीएल हंगाम खेळवण्यासाठी सर्व शक्यतांवर चर्चा करत आहे. तशी गरज पडलीच तर शेवटचा पर्याय म्हणून आयपीएल भारताबाहेरही खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने एका वृत्तसंस्थेला ‘बीसीसीआय सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे. जर आयपीएल देशाबाहेर खेळवण्याच्या पर्यायाचा विचार केला तर तो पर्यायही खुला आहे. पण, हा अंतिम पर्याय असेल. यापूर्वीही देशाबाहेर आयपीएल खेळवण्यात आली होती. गरज पडली तर आताही हा निर्णय घेता येईल.’ अशी माहिती दिली. यंदाची आयपीएल स्पर्धा ही २९ मार्चला होणार होती पण, कोरोना संकटामुळे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली

आयपीएल भारताबाहेर पहिल्यांदा २००९ ला खेळवण्यात आली होती. त्यावेळी आयपीएल दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली होती. त्यानंतर २०१४ ची आयपीएल भारत आणि युएईमध्ये खेळवण्यात आली होती. दरम्यान आयसीसीची १० जूनला टी-20 वर्ल्डकपसंदर्भात बैठक होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या  टी-20 वर्ल्डकपबाबत कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत बाकीच्या कोणत्याही गोष्टीवर अंतिम निर्णय होणार नाही. सुत्रांनी सांगितले की, ‘आयसीसीचा टी-20 वर्ल्डकप बाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार आहोत. आतापर्यंत आयपीएलबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.’

Back to top button