युवराजने दिली 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया! | पुढारी

युवराजने दिली 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचा माजी फलंदाज युवराज सिंग हा काही दिवसांपूर्वी एका जातीवाचक वादग्रस्त वक्तव्यावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला. या वक्तव्यावरुन त्याच्यावर सोशल मीडियावरुन तुफान टीका झाली. याबाबत शुक्रवारी त्याने खुलासा करत आपला म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली. युवराजने भारताचा एकदिवसीय आणि टी-20 संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासोबत इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान यझुवेंद्र चहलला उद्देशून जातीवाचक वादग्रस्त विधान केले होते. 

युवराज सिंगने सोशल मीडियावर एक वक्तव्य प्रसिद्ध करुन घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्याने ‘मी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की, माझा जात, रंग, वंश आणि लिंगावरुन कोणताही भेदभाव करण्यावर विश्वास नाही. मी माझे आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. मी प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि आदर करण्याचा पुरस्करता आहे.’ असे सांगत आपण भेदभावावर विश्वास ठेवत नसल्याचे स्पष्ट केले. 

आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या विचारात बीसीसीआय?

त्यानंतर त्याने, ‘माझ्या मित्राबरोबर झालेल्या संभाषणाचा विपर्यास झाल्याची माझी भावना आहे. तरीही एक सुजान भारतीय नागरिक या नात्याने यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर याबद्दल मी खेद व्यक्त करतो. माझे भारत आणि त्याच्या लोकांवर कायमच प्रेम राहिले आहे.’ असे वक्तव्य प्रसिद्ध करत घडल्या प्रकारावर खेद व्यक्त केला. 

‘पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांनी माझ्यावर राष्ट्रपती भवनात बलात्कार केला’

37 वर्षीय युवराजने भारताला 2011 चा एकदिवसीय वर्ल्डकप आणि पहिला टी-20 वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. युवराज सिंगने जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 

Back to top button