हरमनप्रीत १०० वनडे, टी-२० सामने खेळणारी पहिली भारतीय महिला | पुढारी

हरमनप्रीत १०० वनडे, टी-२० सामने खेळणारी पहिली भारतीय महिला

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारतमध्ये प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रविवारी महिला क्रिकेटची सुरूवात झाली. जवळपास एक वर्षानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ मैदानात उतरेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान टीम इंडियाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात उतरल्यानंतर तिच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद होणार आहे. 

भारतीय क्रिकेट संघातील हरमनप्रीत कौरने आतापर्यंत १०० वनडे सामने खेळले आहेत. हरनमप्रीत अशी कामगिरी करणारी पाचवी भारतीय महिला खेळाडू आहे. त्याचबरोबर हरमनप्रीतने १०० वनडे आणि टी-२० सामने खेळणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. हरमनप्रीतने वनडे करिअरमध्ये आतापर्यंत २४१२ धावा केल्या आहेत.  तिच्या नावावर ३ शतक व ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

हरमनप्रीतने पहली वनडे २००९ मध्ये खेळली. तर पहिला टी-२० सामना ११ जून २००९ मध्ये खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उतरताच हरमनप्रीत भारतासाठी १०० वा एकदिवसीय सामना खेळणारी पाचवी महिला खेळाडू ठरेल. हरमनप्रीत कौरच्या आधी भारतीय कर्णधार मिताली राज (२१०), झुलन गोस्वामी (१३३), अंजुम चोपडा (१२७) आणि अमिता शर्मा (११६) यांनी शंभरहून अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत.

हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाविरुध्द ११५ चेंडूत नाबाद १७१ धावांची सर्वश्रेष्ठ खेळी साकारली. ती भारतीय महिला टी-२० टीमची कर्णधार आहे. हरमनप्रीतने टी-२० फ़ॉर्मेटमध्ये ११४ सामने खेळले असून २१८६ धावा तिने केल्या आहेत.

Back to top button