एका निर्णयाने सुशील कुमारच्या अडचणीत वाढ! | पुढारी

एका निर्णयाने सुशील कुमारच्या अडचणीत वाढ!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कुस्तीपटू सुशीलकुमार याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पैलवान सागर धनकड हत्या प्रकरणातील एका आरोपीला माफीचा साक्षीदार बनविण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. छत्रसाल मैदानात धनकडची हत्या झाली. त्यावेळी प्रिन्स नावाचा युवक घटनास्थळी उपस्थित होता. सुशीलकुमारने त्याला मारहाणीचा व्हिडिओ काढण्यास सांगितले होते. या प्रिन्सने आता माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.

सुशील कुमारमुळे नवज्योतसिंग सिद्धू का चर्चेत?

सागर धनकड हत्या प्रकरणात दोनवेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशीलकुमार चांगलाच अडकत चालला आहे. धनकड हत्या प्रकरणात एकूण १२ आरोपी असून त्यातील विजेंद्र नावाच्या ९ व्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्लीतील टिकरी गावातून पोलिसांनी विजेंद्रला ताब्यात घेतले. सुशीलकुमारच्या सांगण्यावरून आपण धनकडला बेदम मारहाण केल्याचे विजेंद्रने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले आहे.

राहुल त्रिपाठीवर पुणे पोलिसांची कारवाई

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सागर धनकड हत्या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणातील प्रवीण, प्रदीप आणि विनोद प्रधान नावाचे तीन आरोपी अजूनही फरार आहेत. ३७ वर्षीय सुशीलकुमारला अजय नावाच्या सहकाऱ्यासह मुंडका गावात २३ मे रोजी अटक करण्यात आले होते. तत्पूर्वी पोलिसांनी सुशीलकुमारवर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

Back to top button