भारताचा १८ वर्षीय कुस्तीपटू 'चिराग चिक्कारा'नं इतिहास रचला

U23 World Championship मध्ये जिंकल गोल्ड मेडल
U23 World Championship
चिराग चिक्कारानं यू२३ जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा १८ वर्षीय कुस्तीपटू चिराग चिक्कारा (Chirag Chikkara) याने इतिहास रचला आहे. त्याने अल्बानियातील तिराना येथे रविवारी झालेल्या यू२३ (U23) जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये (U23 World Wrestling Championship) पुरुषांच्या ५७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. या थरारक अंतिम सामन्यात चिरागने किरगिझस्तानच्या अब्दिमालिक काराचोव्ह याचा ४-३ असा पराभव केला. यामुळे चिराग हा U23 जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरला आहे.

२०२२ मध्ये भारताच्या अमन सेहरावने U23 जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. अमन सेहरावतच्या पावलावर पाऊल ठेवत, चिरागने जागतिक स्तरावर कुस्तीत मोठे यश मिळवले आहे. भारताच्या रितिका हुड्डा हिने २०२३ मध्ये ऐतिहासिक यश मिळवले होते. ती U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली होती.

युवा कुस्तीपटू चिरागने पहिल्या फेरीत जपानच्या गातुको ओजावा याच्यावर ६-१ असा विजय मिळवला होता. त्याने उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या इयुनस इवबतिरोव्हचा १२-२ अशा गुणासह पराभव केला होता. त्याने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या ॲलन ओरलबेकवर मात करून अंतिम फेरीत धडक मारली होती.

सुजित कलकल आणि विकीला कांस्यपदक

चिरागने अप्रतिम खेळ करत, पहिल्या फेरीत जपानच्या गातुको ओजावा याचा ६-१ असा पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या युनूस इवबतिरोववर १२-२ असा विजय मिळवून त्याने चॅम्पियनशिप फेरीत स्थान पक्के केले होते. U23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सुजित कलकल आणि विकी याने कांस्यपदक मिळवले.

U23 World Championship
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला कधी रवाना होणार? तारीख आली समोर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news