ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांचा प्रवास भत्ता वाढला!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज ग्रास सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. भत्ता वाढवून १५०० रुपये करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयासह अन्य तीन निर्णय घेण्यात आले. 

अधिक वाचा : मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला मिळाली पहिली बोली 

अन्य तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये इनाम व वतन जमिनीवरील अकृषिक बांधकामे नियमित करताना सवलत, दिवा रेल्वे क्रॉसिंगवर पुल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अडाळी येथील राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्थेसाठी जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

अधिक वाचा : कोरोनामुक्त झाल्यानंतर लस कधी घ्यावी? नवीन नियम जारी!

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या मदतीसाठी बऱ्याच ठिकाणी चकरा माराव्या लागता. ग्रामपंचायतीकडून केल्या जाणाऱ्या विकास कामांच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करून ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांचा प्रवास भत्ता वाढवण्यात आला आहे.  दुसरीकडे नवीन अविभाज्य शर्थींने दिलेल्या इनाम आणि वतन (महार वतन व देवस्थान जमीन वगळून) जमिनी ज्या भोगवटादार वर्ग-2 च्या आहेत, त्यांच्यावरील अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

अधिक वाचा : महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून म्युकर मायकोसिसवर मोफत उपचार होणार : राजेश टोपे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news