Huma S Qureshi
मनोरंजन
हुमा कुरेशी म्हणते, सोनाक्षी माझी बहीण
पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा चर्चेत आहेत. हुमा आणि सोनाक्षी यांचा 'डबल एक्सल' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी हुमा आणि सोनाक्षीने 20 कि लो वजन वाढवले होते.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान देखील सोनाक्षी आणि हुमा मस्ती करताना दिसल्या. सर्वांना वाटले की, प्रत्यक्षात सोनाक्षी आणि हुमा चांगल्या मैत्रिणी आहेत. हुमा म्हणाली, सोनाक्षी माझी बहीण आहे. हुमा कुरेशीला सोनाक्षी आणि तिच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आले. यावेळी हुमा म्हणालीकी, मी आणि सोनाक्षी मैत्रिणीनसून मी सोनाक्षीला माझी बहीण मानते. कारण, आम्हीदोघी आता मैत्रीच्या नात्यापेक्षाहीपुढे गेलो आहोत. 'डबल एक्सल' चित्रपटावेळी आम्ही खूप वेळ सोबत घालवला आहे. सध्या आमच्यात सुंदर नाते आहे

