समंथाने सर्वांना टाकले मागे; सोशल मीडियातील एका पोस्टसाठी घेते 3 ते 5 कोटी!

समंथाने सर्वांना टाकले मागे; सोशल मीडियातील एका पोस्टसाठी घेते 3 ते 5 कोटी!
Published on
Updated on

अभिनेते, अभिनेत्री चित्रपटांशिवाय प्रमोशन आणि जाहिरातींतूनही चांगली कमाई करत असतात. आता या यादीत सोशल मीडिया पोस्टचाही समावेश झाला आहे. हे कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका पोस्टसाठी कोट्यवधी रुपये मोबदला घेतात. यामध्ये आता दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाने प्रियांका चोप्रा-जोनास, शाहरूख खान यांनाही मागे टाकले आहे. समंथा एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी एक पोस्टसाठी तीन कोटी रुपये घेते. तर अन्य वेबसाईट्स आणि प्रमोशनल पोस्टसाठी 5 कोटी रुपये घेते.

आजघडीला समंथा सोशल मीडिया पोस्टमधून सर्वाधिक कमाई करते. इतर बॉलीवूड कलाकार किती मोबदला घेतात, त्यावर एक नजर…
प्रियांका चोप्रा-जोनास देसी गर्ल प्रियांका आता इंटरनॅशनल सेलिब्रिटी बनली आहे. ती एका सोशल मीडिया पोस्टसाठी 1 कोटी 80 लाख रुपये मोबदला घेते.दीपिका पदुकोन अलीकडच्या काळात बॉलीवूडमध्ये स्वतःचे नाणे खणखणीत वाजवलेल्या दीपिका पदुकोनही सोशल मीडिया फीमध्ये कमी नाही. ती एका प्रमोशनल पोस्टसाठी 1 कोटी 50 लाख रुपये घेते.

आलिया भट्ट आलिया सध्याची सर्वाधिक यशस्वी बॉलीवूड अभिनेत्री आहे. शिवाय तिने तिच्या भूमिकांमध्येही कमालीचे वैविध्य राखले आहे. प्रमोशनल पोस्टचा विचार करता, एका पोस्टसाठी आलिया 1 कोटी रुपये घेते. शाहरूख खान बॉलीवूडचा किंग खान या यादीत या सर्व अभिनेत्रींच्या मागे आहे. शाहरूख एका सोशल मीडिया पोस्टसाठी 80 लाख रुपये मोबदला घेतो. सलमान खान बॉलीवूडचा 'दबंग' कलाकार सलमान खान सोशल मीडिया पोस्टसाठी 50 लाख रुपये चार्ज करतो. रणवीर सिंग बॉलीवूडचा एनर्जी किंग रणवीर सिंग सोशल मीडियावर एका प्रमोशनल पोस्टसाठी 81 लाख रुपये घेतो. या यादीत तो पत्नी दीपिका पदुकोनपेक्षा मागे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news