वरुण धवनला दाक्षिणात्य चित्रपटांची भुरळ

varun dhawan
varun dhawan

पुढारी ऑनलाईन : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक बॉलीवूड कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटात आपला ठसा उमटवला आहे, तर आता अनेक बॉलीवूड कलाकारही दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. अभिनेता वरुण धवन याने आता बॉलीवूडवर निशाणा साधत दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'भेडिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. एका मुलाखतीत त्याला दाक्षिणात्य आणि बॉलीवूड चित्रपटांची होणारी तुलना याबद्दल प्रश्न विचारला. तो म्हणाला, सध्या प्रेक्षक बॉलीवूड झिडकारत आहेत. दाक्षिणात्य चित्रपट उत्कृष्ट दर्जाचे असतात. बॉलीवूडने दाक्षिणात्य चित्रपटांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखे काम केले पाहिजे. जर दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत तर आपण त्यांच्याबरोबर मिळून का नाही काम करू शकत? किंवा दाक्षिणात्य चित्रपटांसारखा चित्रपट का नाही बनवू शकत?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news