पुढारी ऑनलाईन ; हॉलीवूडच्या काही फिल्म फ्रँचायजी जगभरात खूप प्रसिद्ध आहेत. यातील अलीकडच्या काळातील एक फिल्म फ्रँचायजी म्हणजे 'जॉन विक.' निओ नॉयर अॅक्शन थ्रिलर जॉनरमधील ही चित्रपट सीरिज आहे.
हे कॅरेक्टर अनेकांना खूप आवडते. त्याचे कारण म्हणजे जॉनचे राहणीमान, जॉनची स्टाईल, जॉनचे फायटिंग स्किल्स आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे या कॅरेक्टरचा अॅटिट्यूड. अलीकडच्या काळात त्यावर खूप मीम्सही बनल्या आहेत. या फ्रँचायजीतील तीन चित्रपट आतापर्यंत रीलिज झाले आहेत. चौथ्या आणि पाचव्या भागांचे काम सुरू आहे. पैकी 'जॉन विक चॅप्टर 4' हा पुढील वर्षी 24 मार्च रोजी रीलिज होणार आहे.