

पुढारी वृत्तसेवा : ए. आर. रेहमान भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. भारतीयांच्या जीवनात रंग भरणार्या ज्या गोष्टी आहेत त्यात रेहमानचे संगीतही आहे. नुकताच रेहमानचा कॅनडात सन्मान करण्यात आला आहे आणि खरेतर देशासाठी ही बाब गौरवास्पद आहे. ए. आर. रेहमान यांचे नाव कॅनडातील एका रस्त्याला देण्यात आले आहे.
येथील सिटी ऑफ मार्खम येथे एका रस्त्याला ए. आर. रेहमान मार्ग असे नाव दिले आहे. त्यावर रेहमानने ट्विटरवरून आभार मानले आहेत. मी सआयुष्यात असे कधी होईल, असा विचार केला नव्हता. मी सिटी ऑफ मार्खम, मेयर फ्रँक ,स्कारपिट्टी आणि कौन्सलर तसेच इंडियन कॉन्स्युलेट जनरल अपूर्व श्रीवास्तव आणि कॅनडावासीयांचा खूप आभारी आहे, असे रेहमानने ट्विटमध्ये म्हटले आहे.