पुढारी ऑनलाईन : 'पुष्पा', 'केजीएफ' पाठोपाठ अभिनेता ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट 30 सप्टेंबरला कन्नड व मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित झाला. तर 14 ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर या चित्रपटाने 'केजीएफ चॅप्टर 2', 'आरआरआर' चित्रपटांना मागे टाकले आहे.
'कांतारा' ला आयएमडीबीवर 10 पैकी 9.6 रेटिंग मिळाली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा रेकॉर्ड आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'जय भीम' पाठोपाठ आयएमडीबीवर सर्वाधिक रेटिंग मिळवणारा हा दुसरा दाक्षिणात्य चित्रपट ठरला आहे. तसेच चित्रपटाने हिंदी भाषेतही चांगलीच कमाई करायला सुरुवात केली आहे.
पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 1.27 कोटींचा गल्ला जमवला. शनिवारी या चित्रपटाच्या कमाईमध्ये 130 ते 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसर्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3.50 कोटी इतकी कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखीन कमाई करेल. 'पुष्पा'प्रमाणे ओटीटीवर प्रदर्शित होऊनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.