ओटीटीवर ‘विक्रम वेधा’चे आकर्षण

vikram-vedha
vikram-vedha

पुढारी ऑनलाईन : 2022 मध्ये प्रदर्शित 'विक्रम वेधा' चित्रपटातील ऋतिक रोशनची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकांपैकी एक मानली जाते. याच 'विक्रम वेधा' चित्रपटाची आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऋतिक रोशनचा 'विक्रम वेधा' रीलिज झाला असून ऋतिकच्या पॉवरफूल परफॉर्मन्सला चाहत्यांनी उचलून धरले आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवरील हा 2022 मधील चित्रपट ऋतिकचा सर्वोत्तम ठरतो आहे. एकीकडे, ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राईम-ड्रामाचे प्रमाण कमी होत असताना या चित्रपटाबद्दल मात्र नेटिझन्समध्ये औत्सुक्य राहिले आहे. ऋतिकने साकारलेले विविध पैलू चाहत्यांना प्रभावित करून गेले असून भाषेची माहिती नसतानाही केवळ ऋतिकसाठी आपण हा चित्रपट पाहिला, असे काही यूजर्सनी नमूद केले.

ऋतिकचा हा कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट असल्याचा अभिप्राय काहींनी दिला, तर काहींनी 'अभिनयातील मास्टर क्लास' अशा शब्दांत ऋतिकची प्रशंसा केली. ऋतिक रोशन यानंतर 'फायटर' चित्रपटातून झळकणार असून ही भारतातील पहिली एरियल अ‍ॅक्शन मुव्ही असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने ऋतिक व 'वॉर' चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे पुन्हा एकदा एकत्रित येत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news