‘आशिकी – ३’ मध्ये कार्तिक-सारा?

आशिकी - ३
आशिकी - ३

पुढारी ऑनलाईन : कार्तिक आर्यनच्या आगामी 'आशिकी- ३' चित्रपटाबाबत आणखी काही माहिती समोर आली आहे. निर्माते अनेक दिवसांपासून या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. मात्र, आता त्याचा शोध संपला आहे. सारा अली खान आणि कार्तिक या चित्रपटात एकत्र झळकण्याची शक्यता आहे. 'आशिकी- ३' च्या निर्मात्यांना कार्तिकसोबत साराला कास्ट करायचे असून त्यांची तिच्याशी चर्चाही सुरू आहे.

साराने कार्तिकसोबत स्क्रीन शेअर करण्यास होकार दिला, तर चाहत्यांसाठी ते एखाद्या आनंदाची बाब असेल. मात्र, निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. साराने ही ऑफर स्वीकारली तर कार्तिक-साराचा हा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी दोघेही इम्तियाज अलींच्या 'लव्ह आज कल – २' या चित्रपटात एकत्र दिसले होते. दोघांनी एकमेकांना डेटही केले आहे.

काही वर्षांपूर्वी साराने 'कॉफी विथ करण' मध्ये वडील सैफ अली खानसमोरच कार्तिकवर क्रश असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर दोघे 'लव्ह आज कल – २' मध्ये झळकले, त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा विरून गेल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news