

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट व रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. त्यांना नुकतेच कन्यारत्न झाले आहे. लेकीच्या जन्मानंतर काही दिवसांनंतरच रणबीर कामावर परतला. आता आलियाही लेकीला सांभाळत स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. नुकतेच आलियाला योगा क्लासबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लेकीला घरी सोडून योगा करायला आल्यामुळे काहींनी आलियाला ट्रोल केले आहे. आलियाच्या या फोटोंवर कमेंट करत एकाने मुलीला घरी एकटीला सोडून योगा. काय आई होणार तू? असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने एवढ्या छोट्या बाळाला नोकराकडे सोडून आली, अशी कमेंट केली आहे.