पुढारी ऑनलाईन : सिद्धार्थ आनंदच्या 'वॉर' चित्रपटातील यशानंतर टायगर श्रॉफ आता दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या साथीने अॅक्शनपटात झळकणार आहे. 'बड़े मियाँ, छोटे मियाँ' असे या चित्रपटाचे नाव असून एकापेक्षा एक सरस असे अॅक्शन सीन्स यात असणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित होणे अपेक्षित आहे.
अक्षय कुमार व टायगर सैनिकाच्या गणवेशात शत्रूवर जोरदार हल्ला चढवत असल्याचे एक छायाचित्र शेअर केले गेले असून टायगर मशिनगन तर अक्षय पिस्तूलसह होता.
टायगरचा या चित्रपटातील लूक त्याच्या 'वॉर' चित्रपटाची आठवण करून देणारा आहे. या चित्रपटासाठी अक्षयने ईदचा दिवस निवडल्याने अनेक यूजर्सनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले. एरवी ईदच्या दिवशी सलमान खानचे चित्रपट प्रदर्शित होतात. याचाच संदर्भ घेत एका यूजरने गंमतीने अक्षयला प्रश्न केला, 'भाईसे पुछ लेना, ईद लेलू क्या?"