मुंबई: पुढारी ऑनलाईन
यंदाच्या वर्षी कला विश्वाने अनेक दिग्गज कलाकारांना गमावले आहे. रविवारी ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असतानाच हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्धी अभिनेत्रीचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या भटनागर (Yeh Rishta Kya Kehlata Hai actress Divya Bhatnagar passes away after battling against Covid-19) यांचे निधन झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या भटनागर यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे दिव्या यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. टीव्ही मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये 'गुलाबो' ही भूमिका त्या स्विकारत होत्या.