नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : 'ये जवानी है दिवानी' फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्माने बॉयफ्रेंड तुषान भिंडी याच्याशी विवाह बंधनात अडकली. विवाह सोहळा ऑस्ट्रेलियात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. एवलिन स्वत: च सोशल मीडियावर फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे.
एवलिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक लग्नाचे फोटो शेअर केले आहे. या फोटोत एवलिन आणि तिचा पती तुषान भिंडी दिसत आहेत. यावेळी एवलिनने ब्रायडल गाउन घातला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये एवलिनने लिहिले आहे की, 'नेहमीच मी तुमच्यासोबत'. यासोबतच एवलिनने हार्ट असणारा इमोजीदेखील शेअर केला आहे.
वाचा : 'आई कुठे काय करते' : संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धचा निर्णय
तुषान भिंडी हे डेंटल सर्जन आहेत. एवलिन आणि तुषान हे दोघेजण अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. एवलिनच्या लग्नाची माहिती समजताच चाहत्यांनी दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा : यामी गौतम आणि आदित्य धर याच्या लग्नाचा अल्बम पाहिला का?
एवलिन शर्माने 'फ्रॉम सिडनी विद लव' या चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने एकापैक्षा एक चित्रपट गाजवले. यात 'तेरा हीरो', 'जब हैरी मेट सेजल', 'यारियां', 'ये जवानी है दीवानी' आणि 'साहो' या गाजलेल्या चित्रपटात अभिनय केला. 'यारियां' चित्रपटातील 'सनी सनी' गाण्यामुळे एवलिनला खूपच लोकप्रियता मिळाली. 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत काम केले होते.
(photo : evelyn_sharma instagram वरून साभार)