

भाभीजी घर पर है फेम अभिनेत्री सौम्या टंडन सोशल मिडियावर बरीच अॅक्टिव असते. यावर अनेकदा ती पर्सनल लाईफबाबत अनेक खुलासे करत असते. आताही तिने अशीच एक घटना शेयर केली आहे. सौम्या नुकतेच कॉलेजला जायला लागल्यानंतरची ही घटना आहे.
सौम्या म्हणते आता ही घटना आठवून हसू येते पण त्यावेळी ती या प्रकाराने प्रचंड घाबरली होती. ती सांगते ती सायकलने घरी जात होती. त्यावेळी तिचा एक सीनियर तिच्या जवळ आला. त्यानंतर त्याने सौम्याला हॅप्पी व्हेलेंटाईन विश केले. आणि अचानक त्याने तिच्या भांगेत सिंदूर भरला. अचानक झालेल्या या प्रकराने सौम्या चांगलीच घाबरली. तिला वाटले या मुलाने तिच्या चेहऱ्यावर अॅसिडच टाकले.
भाभीजी घर पर है मधील गोरी मेम या व्यक्तिरेखेने सौम्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. नंतर अचानक मालिकासोडत तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सौरभ देवेंद्र सिंगसोबत तिने गुपचुप लग्नगाठ बांधली. पण मुलाच्या लग्नानंतर ती पूर्णवेळ मुलासाठी देण्याचा निर्णय घेतला.