

पुढारी ऑनलाईन डेस्क : रश्मिका मंदाना ही अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असते, दोघांनी याबाबत अधिकृत असे काहीच भाष्य केलेले नाही; पण हे दोघे एकत्र यावेत, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. रश्मिका आणि विजय हे नेहमीच सुट्टीवर अथवा हॉटेलमध्ये डिनर घेण्यासाठी जात असताना दिसत असतात. आता विजयने या नात्याबद्दल भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत तो म्हणाला की, मी आमच्या नात्याबाबत तेव्हाच बोलेन जेव्हा मी पूर्णपणे तयार असेन. मला जेव्हा वाटेल की, जगाला याबाबत माहिती देण्याची गरज आहे व मी हे सर्वांना सांगू शकतो, असे वाटेल त्यावेळीच नात्याबाबत माहिती शेअर करेन. यासाठी काहीतरी कारण अथवा तशी वेळ आली पाहिजे, त्या दिवशी मी आनंदाने माझ्या पद्धतीने याबाबत बोलेन.
मला माहीत आहे की, चाहत्यांना कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. जेव्हा तुम्ही एक सार्वजिनक व्यक्ती असता तेव्हा हा तुमच्या कामाचाच भाग असतो. मला कधीच याचा दबाव वाटला नाही. असेही तो म्हणाला.