Iqbal Darbar Passes Away: ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन

त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
Iqbal Darbar Passes Away
ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन Pudhari
Published on
Updated on

पुणे: ऑर्केस्ट्रा विश्वातील महत्वाचे योगदान देणारे, ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक आणि 'दरबार बँड' चे संस्थापक-संचालक इक्बाल दरबार (वय ७७) यांचे शनिवारी (दि.२८) निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये इक्बाल दरबार यांचा उल्लेख होतो. त्यांच्या वादनाचे चाहते केवळ पुणे-मुंबईपुरते मर्यादित नव्हते तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने भारावून जात असत.

पुणे महानगरपालिकेत आयोजित एका कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचा सन्मान करण्यात आला होता, त्यावेळी 'मधुबन में राधिका नाचे रे' हे गीत दरबार यांनी सॅक्सोफोनवर सादर केले. त्यांच्या त्या सादरीकरणाने दिलीपकुमार इतके भारावून गेले की, त्यांनी उभे राहून त्यांना दाद दिली आणि वन्स मोअरची मागणी केली.

दरबार यांचे कार्य केवळ संगीतपुरते मर्यादित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची खास वैशिष्ट्ये होती. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या दरबार बँडद्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे.

त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांची मने जिंकली आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी हा कृतज्ञता निधी म्हणून सैन्य दलाला दिला. तसेच भोई फाउंडेशनच्या पुण्याजागर उपक्रमासाठीही त्यांनी कृतज्ञता निधी दिला. त्यांनी स्थापन केलेल्या 'मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन'च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी ते झटत होते. भोई प्रतिष्ठानमध्ये ते समन्वयक म्हणून कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news