

Vivek lagoo passes away Daughter emotional Post
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे गुरुवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. लेखन, संगीत दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही क्षेत्रात विवेक लागू यांचे योगदान होते. विवेक यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत लेक मृण्मयीने लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
मराठी मालिका आणि रंगभूमी यावर विवेक लागू यांनी आपला खास ठसा उमटवला आहे. त्यांच्या निधनानंतर मुलगी मृण्मयी लागू हिने भावनिक पोस्ट शेयर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, आम्ही बराच काळ एकत्र लढलो पण, आता प्रेम आणि कृतज्ञतेने निरोप घेण्याची वेळ आली आहे. माझे बाबा! माझे खूप चांगले मित्र, माझे मार्गदर्शक, माझे नंबर वन फॅन होते… तुमच्या सगळ्या गोष्टी कायम आठवणीत राहतील. तुमची खूप आठवण येईल बाबा…एका मुलीसाठी असणारे सर्वोत्तम बाबा तुम्ही होतात.
विवेक यांचा जन्म पुण्यात झाला. अभिनयच्या ओढीने त्यानं मुंबईला आणले. रंगभूमीवर काम करताना रीमा आणि विवेक यांची एकमेकांशी ओळख झाली. त्या दरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 1978 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर मृण्मयीचा जन्म झाला. तिच्या जन्मानंतर मात्र या दोघांचे खटके उडायला लागले. यानंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण वेगळे झाल्यानंतर दोघांनी पुन्हा लग्न केले नाही.
मृण्मयीने वडिलांचा लेखनाचा वारसा पुढे चालवला आहे. तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाचे लेखन मृण्मयीने केले होते. या सशक्त पटकथेसाठी तिचे कौतुकही झाले होते. तसेच माध्यमविश्वावर आधारित स्कूप सिरिजचीही ती लेखिका आहे. 3 इडियट्स, तलाश, वी आर फॅमिली आणि जिंदगी मिलेगी ना डोंबार या सिनेमांसाठी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.