मुंबई : पुढारी ऑनलाईन
नाटक, सिनेमा आणि मालिकांमधून विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते लीलाधर कांबळी यांच्या निधनाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा कलाकार कायमस्वरूपी गमावला असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणाले, 'हिमालयाची सावली', 'कस्तुरी मृग', 'राम तुझी सीता माऊली', 'लेकुरे उदंड झाली', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'आमच्या या घरात', 'शॉर्टकट', 'दुभंग' अशा सुमारे ३० हून अधिक नाटकांत तसेच अनेक मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विनोदी भूमिका करताना त्यांनी विनोदाची पातळी सोडली नाही. गेली काही वर्षे कांबळी कर्करोगाशी झुंज देत होते, मात्र आज ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.