अभिनेते अविनाश खर्शीकर काळाच्या पडद्याआड

Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानं अविनाश यांची प्राणज्योत मालवली आहे. आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१९७८ मध्ये 'बंदिवान मी या संसारी' चित्रपटनंतून त्यांनी सिनेसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी माफीचा साक्षीदार,  जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, चालू नवरा भोळी बायको, घरचा भेदी, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, चल गंमत करु, किस बाई किस, दे टाळी, येडा का खुळा?, रणांगण, डोक्याला ताप नाही, राणीनं डाव जिंकला, माझा छकुला, लपवाछपवी, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, यांसारख्या अनेक मराठी  चित्रपटांमध्ये खूप भूमिका साकारल्या होत्या.

तसेच अविनाश यांनी कानून या हिंदी चित्रपटात अजय देवगन, उर्मिला मातोंडकर, अभिनेता किरण कुमार यांच्यासोबतही काम केले आहे.  

प्रसिध्द नाटके  

अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू ही त्यांची प्रसिध्द नाटके होती. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news