

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या अभिनयासोबत वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टीमुळे सतत चर्चेत असते. सध्या उर्वशी 'रब्बा करे' या गाण्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या नवीन गाण्याच्या प्रमोशनमध्ये तिने कोणतीही कसूर कमी केलेली नाही. मात्र, याच दरम्यान ती उप्स् मोमेंट शिकार झाल्याने तिला ट्रोल केलं जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या 'रब्बा करे' या नवीन गाण्याच्या प्रमोशनसाठी इंडियाज बेस्ट डान्सर शोच्या सेटवर दिमाखात पोहोचली. या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये तिच्यासोबत संगीतकार शैल ओसवाल होता. यावेळी तिने ब्लॅक रंगाचा शीअर पॅन्टसूट परिधान केला होता. जो, सर्वाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. यावेळी शैल आणि उर्वशीने पॉपाराजीच्या कॅमेऱ्याला एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या. मात्र, याच दरम्यान उर्वशी उप्स मोमेंटची शिकार बनली.
पॉपाराझीला पोज दिल्यानंतर उर्वशी जेव्हा पाठीमागे फिरली तेव्हा तिच्या ड्रेस फाटलेला दिसला. यामुळे सर्वाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. दरम्यान एकिकडे उर्वशीच्या बॉडिकॉन ड्रेसचे भरभरून कौतुक केलं. तर दुसरीकडे नेकऱ्यांनी तिच्या ट्रोल करत ड्रेस डिझाईनरला बदलण्याचा सल्ला दिला आहे.
उर्वशीचा व्हिडिओवर कॉमेन्टस् करताना एका युजर्सने लिहिले की, 'ओ शेट, एवढे मोठे सेलेब्रिटीज फाटलेले कपडे घालतात'. दुसऱ्या एका युजर्सने लिहिले की, 'उर्वशीचा ड्रेस फाटला आहे. कृपया तिचा ड्रेसिंग सेन्स सुधारा'. तर तिसऱ्या एका युजर्सने 'त्यांना चांगल्या स्टायलिस्टची गरज आहे'. असे म्हटलं आहे.
याआधी उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर स्वतःचा एक फ्रेंच बोलताना व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होतं की, ''माझी फ्रेंच बोलण्याची कला आहे. फ्रान्सकडून इतकं प्रेम मिळाल्यावर त्यांची भाषा अंगीकारणंच योग्य वाटतं. फ्रेंच भाषेतील एका नवीन प्रवासाचा आनंद, प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद, माझे आश्चर्यकारक चाहते...कृतज्ञ.''
( video : viralbhayani instagram वरून साभार)