उर्वशी रौतेला ही नेहमी वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून सेलिब्रिटींच्या डेटिंग अॅप प्रोफाईलबाबत माहिती समोर येत आहेत. यामध्ये हृतिक रोशन, आदित्य रॉय- कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, या बातम्या खऱ्या आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आता उर्वशीने डेटिंग अॅप प्रोफाइलबाबत खुलासा केला आहे. डेटिंग अॅपवर अनेक सेलिब्रिटींचे प्रोफाईल पाहिले असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे. उर्वशी म्हणाली की, मी राया अॅपवर आहे; पण केवळ मित्रांसाठी आहे आणि अन्य कोणत्याही दृष्टिकोनासाठी नाही. हृतिक राया अॅप आहे. मी अॅपवर अर्जुन कपूर आणि आदित्यलाही पाहिले आहे. या तिघांशिवाय मी अॅपवर अन्य अनेक सेलिब्रिटी पाहिले आहेत. मी राया अॅपवर स्वाईप केले, त्यावेळी ती गंमतीने म्हणाली की, माझ्याकडे आधीच त्यांचा नंबर आहे. मला उजवीकडे स्वाईप करण्याची गरज का असेल?
वेळापत्रकानुसार माझ्याकडे मोकळा वेळ असेल आणि त्यांच्याकडे मोकळा वेळ असेल तर बोलू शकतो. मग अनेकांना तुम्हाला संदेश पाठवण्यासाठी पैसे द्यावे लागतात. बॉलीवूड कलाकारांच्या डेटिंग प्रोफाईलचे स्क्रीनशॉट व्हायरल होत असताना उर्वशीने या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. हृतिकला या प्लॅटफॉर्मवर पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.