आता एवढंच बाकी होतं! उर्फी जावेदने बनवला चक्क आपल्या फोटोंचाच ड्रेस

आता एवढंच बाकी होतं! उर्फीने बनवला चक्क आपल्या फोटोंचाच ड्रेस
Urfi Javed
आता एवढंच बाकी होत ! उर्फी जावेदने बनवला चक्क आपल्या फोटोंचाच ड्रेसUrfi Javed instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) ही आपल्या चित्र-वित्र फॅशनमूळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री. हटके आणि शॉर्ट कपडे हे आता उर्फीचे समीकरण बनले आहे. बऱ्याचवेळा तिच्या फॅशनसेन्स ( Urfi Javed Photodress) पाहुन चाहते म्हणतात ' हद कर दी आपने…'

Urfi Javed Photodress : फोटोंचाच ड्रेस

उर्फी जावेद (Urfi Javed) विचीत्र फॅशनमूळे नेटकऱ्यांकडुन ती बऱ्याचवेळा ट्रोल (Troll) झाली आहे आणि चर्चेत आली आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पून्हा एकदा नेटकऱ्यांच्या रोषाला बळी पडाव लागलं आहे. उर्फी आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ ( Urfi Javed Photodress) सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतचं तिने आपले काही फोटोज आणि व्हिडिओ इन्स्टाग्रानवर शेअर केले आहेत. आणि कॅप्शन द्या म्हंटले आहे. तिने यामध्ये तिने चक्क आपल्या फोटोंचाच ड्रेस घातला आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

तिच्या या फोटो आणि व्हि़डिओवर संमिश्र कॉमेंट येत आहेत. एका युझरने सल्ला दिला आहे की,'इसको हॉस्पिटल लेकर जाओ', एक युझर्स म्हणतं आहे, 'ये क्या पहना हैं तुम्हने, कहॉं से लोग आते हैं'. उर्फी आताच ट्रोल झाली नाहीतर याअगोदरही ती ट्रोल झाली आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओ करत ती चाहत्यांशी संपर्कात असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news