

आपल्या बोल्ड फॅशन आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणार्या उर्फी जावेद आणि निया शर्मा यांच्यातील वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी रिअॅलिटी शो स्प्लिट्सविलामध्ये या दोन्ही अभिनेत्री एकत्र दिसणार आहेत, परंतु शो सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे.
उर्फीने नुकताच निया शर्मा, करण कुंद्रा आणि सनी लिओनी यांच्यासोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओवर एका चाहत्याने विचारले, “तुमच्यात तर भांडण झाले होते, आता ते संपले का?” यावर उर्फीने उत्तर दिले, “नाही, आम्ही अजूनही एकमेकींचा तिरस्कार करतो.” उर्फीच्या या कमेंटवर नियाने प्रत्युत्तर देताना म्हटले, “तुझ्या मर्यादेत राहा, प्लीज!” यावर उर्फीने पुन्हा “चुप राहा” असे म्हणत तिला सुनावले.
नेटकर्यांमध्ये आता दोन गट पडले आहेत. काहींना वाटते की, हे शोच्या प्रसिद्धीसाठी केलेले नाटक आहे, तर काहींना त्यांच्यातील वाद खरा वाटत आहे. स्प्लिट्सविलाच्या आगामी सीझनमध्ये या दोघींच्या एन्ट्रीमुळे मोठा ड्रामा बघायला मिळणार, हे आता निश्चित झाले आहे.