Twinkle Khanna | वडिलांनी सांगितले होते, चार बॉयफ्रेंड बनव

वडिलांनी सांगितले होते, चार बॉयफ्रेंड बनव
Twinkle Khanna
ट्विंकल खन्ना instagram
Published on
Updated on

अभिनेत्री ड्रिंकल खन्ना ही बॉलीवूडपासून सध्या दूर असली, तरी तिच्या बेधडक वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. ट्रिकलचा खूपच मोठा चाहतावर्ग आहे. ड्रिंकल नेहमीच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत असते. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण प्रेग्नंट असल्यासारखे वाटत असल्याचे थेट म्हटले होते. ती खरोखरच प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. आता ट्रिकलने एक मोठा खुलासा केला आहे. तिने आपणास काही वर्षांपूर्वी वडिलांनी काय सल्ला दिला होता यावर भाष्य केले आहे. एवढेच नाही, तर वडील राजेश खन्ना यांनी आपल्याला बॉयफ्रेंडबाबत हा सल्ला दिल्याचे ट्विंकल म्हणाली.

ट्विंकल म्हणते की, माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला होता की, एकाच वेळी चार बॉयफ्रेंड बनव, त्यामुळे तुझे हृदय कधीच तुटणार नाही. मी माझ्या वडिलांना ही गोष्ट कधीच सांगू शकले नाही की, माझे हृदय तोडण्याची ताकद केवळ एकाच व्यक्तीमध्ये आहे ती म्हणजे माझे वडीलच. माझ्यासाठी कायमच डिसेंबरमध्ये फादर्स डे असायचा. ट्रिकल बॉलीवूडपासून दूर असली, तरी कॉलम लिहिणे आणि लेखनात ती व्यस्त असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news