'लक्ष्मी निवास' मध्ये तुषार दळवीची एन्ट्री

'लक्ष्मी निवास' मध्ये तुषार दळवीची एन्ट्री
Tushar Dalvi LaxmiNiwas
'लक्ष्मी निवास' मध्ये तुषार दळवीची एन्ट्री Tushar Dalvi
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठी नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अनुभवायची संधी देत असते. 'लक्ष्मी निवास' या निमित्ताने हा अनुभव पुन्हा एकदा मिळणार आहे. या मालिकेत तुम्हाला उत्तम कलाकार दिसणार आहेत, पण एक चेहरा जो मराठी टेलिव्हीजनवर खूप वर्षांनी पुनरागमन करत आहे. तो म्हणजे, उत्कृष्ट अभिनेता तुषार दळवी. तो 'लक्ष्मी निवास' मालिकेत 'श्रीनिवास'ची भूमिका साकारत आहे.

तुषार दळवींनी आपल्या नव्या भूमिकेबद्दल बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. "लक्ष्मी निवास'' या मालिकेत मी 'श्रीनिवास' ची भूमिका साकारत आहे. तो एक मध्यमवर्गीय माणूस आहे जो एका गाडीच्या कंपनीमध्ये सुपरवायझर आहे. प्रामाणिक, सच्चा आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा आहे. त्याची पाच मुलं आणि एक मुलगा त्याने दत्तक घेतला आहे. अशी मोठी एकत्र फॅमिली आहे. हा श्रीनिवास अत्यंत प्रामाणिक, स्वाभिमानी आहे. लक्ष्मीवर म्हणजेच त्याच्या बायकोवर खूप प्रेम करणारा असा श्रीनिवास आहे. सगळ्या मुलांचं चांगल व्हावं अशी त्याची इच्छा आहे. त्यांचं आयुष्य, त्यांचा संसार व्यवस्थित होऊ दे यासाठी श्रीनिवास प्रयत्न करत आहे. प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणारा, त्याच बरोबर आधुनिक विचारांचा आहे. त्याच एक स्वप्न आहे की, स्वतःच एक छान घर असावं. घर बांधण त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण, लक्ष्मी व श्रीनिवास यांच्या लग्नाच्या वेळी लक्ष्मीने तिच्या वडिलांना व भावाला एक वचन दिलं होतं. लक्ष्मीचा हा शब्द श्रीनिवासला पूर्ण करायचं आहे. हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे.

'लक्ष्मी निवास' मालिकेतील भूमिकेसाठी जेव्हा मला फायनल कॉल आला तेव्हा खूपच आनंद झाला. झी मराठी वाहिनीबरोबर एक जुनं नात आहे आणि बऱ्याच वर्षांनी मालिका करायला मिळत आहे. ते ही झी मराठीच्या रौप्य महोत्सवावर्षी. त्यात भर म्हणजे, मी हर्षदा सोबत काम करत आहे आणि ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. इतके वर्ष एकमेकांना ओळखत असलो तरीही याआधी कधी तो योग्य जुळून आला नाही. पण 'लक्ष्मी निवास'ने ते शक्य केले. जेव्हा आम्ही पहिला प्रोमो शूट केला, तेव्हा खूप मजा आली कारण, मी त्यात स्कुटर चालवत आहे. मी जवळपास २०-२५ वर्षांनी स्कुटर चालविली असेन. माझ्याकडे फारपूर्वी अशीच एक स्कुटर होती जी आम्ही प्रोमोमध्ये दाखवली आहे. त्या स्कुटरवर बसल्यावर माझा सर्व भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरून सरकला. त्यानंतर थोडं टेंशन ही आलं कारण स्कुटर बॅलन्स करायची आणि त्यासोबत मी एकटा नव्हतो हर्षदा ही होती. तेव्हा तिची ही काळजी होती. आम्ही तो प्रोमो लाईव्ह लोकेशनवर शूट केलाय आणि पूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. जेव्हा मेकअप करून तयार झालो विग, चश्मा हे घातल्यावर मी थक्क झालो स्वतःला ओळखू शकलो नाही. त्यामुळे माझा हा लूक आकर्षण ठरणार आहे.

अभिनेता म्हणून प्रत्येकाला काही तरी नवीन हवं असत. 'लक्ष्मी निवास' या मालिकेतील लूकमुळे वेगळा तुषार दळवी प्रेक्षकांसमोर येईल. त्यामुळे हे पात्र साकारायला मदत होते आणि नक्कीच माझं हे पात्र प्रेक्षकांना आवडेल.'लक्ष्मी निवास' मालिका ही एकत्रित कुटुंबावर आधारित आहे. ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ठरेल. आमच्या कुटुंबात प्रत्येक पात्रच वेगळं स्थान आहे, त्यामुळे प्रत्येक पात्राबरोबर प्रेक्षक जोडले जातील आणि मनोरंजनाची १०० टक्के खात्री देऊ शकतो मी. त्याबरोबर सर्वसाधारण कुटुंबातली जी मूल्य आहेत, ती सुद्धा लोकांना बघायला मिळतील. संकटाच्या आणि कठीण वेळी आम्ही कसे मार्ग काढतो, एक सकारात्मक गोष्ट शोधायचा प्रयत्न करतो हे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. "लक्ष्मी निवास" ही मालिका २३ डिसेंबरपासून दररोज रात्री ८ वा. झी मराठीवर पाहायला मिळेल.

Tushar Dalvi LaxmiNiwas
'लक्ष्मी निवास' -प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला आपलीशी वाटेल अशी खरी गोष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news